संघटनेचा फलक लावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील मांजरी येथे ९ जुलै २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीचा फलक लावून कायदा व सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण झाला. तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर दगडफेक करून नूकसान केले. या प्रकरणी ग्रामसेवक यांच्या फिर्यादीवरून तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सुरेश लहानु डोंगरे हे राहुरी तालूक्यातील मांजरी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून नोकरी करत आहेत. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ९ जुलै २०२३ रोजी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास एकलव्य संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष संदीप भिमराज बर्डे यांनी मांजरी ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता गावातील बस स्थानक परिसरात वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य संगटना शाखा मांजरी असा फलक लावला.
सदरचा फलक हा गावातील बस स्थानक जवळ लावल्यामुळे गावातील लोकांमध्ये तनावाचे वातावरण निर्माण झालेले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष राहुरी यांनी सदर फलक लावणे बाबत ग्रामपंचयातची कुठलीही परवाणगी न घेता सदरचा फलक लावुन गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला आहे.
तसेच आरोपींनी ग्रामपंचायत कार्यालयवर दगडफेक करुन ग्रामपचायत कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. असे ग्रामसेवक सुरेश लहानु डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्या फिर्यादीवरून एकलव्य संघटनेचे तालूकाध्यक्ष आरोपी संदीप भिमराज बर्डे, बाळासाहेब राघु गोलवड, भाग्यश्री संदीप बर्डे, तिघे रा. मांजरी, ता. राहुरी. यांच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ७५४/२०२३ सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरन कायदा कलम ३ व सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
