शहरात पार्किंगमध्ये लावलेले चारचाकी वाहन चोरट्यांनी चोरून नेले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील श्रेयस अपार्टमेंट च्या पार्किंग मधून दिनांक ८ जुलै २०२३ च्या मध्यरात्री शिरीष गुणे यांच्या मालकीचे चारचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे आता वाहन धारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
शिरिष भास्कर गुणे, वय ७० वर्षे, हे निवृत्त शिक्षक असून ते शहरातील क्रांती चौक परिसरातील श्रेयस अपार्टमेंटमध्ये रहावयास आहेत. त्यांनी घरगुती कामासाठी स्पार्क एल एस शेव्हरेलो क्र. एम. एच. १७ ए. जे. २१२ हे चारचाकी वाहन घेतले होते.
दि. ८ जुलै २०२३ रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान सदर चारचाकी वाहन हे श्रेयस अपार्टमेंट, क्रांती चौक येथील कंपाऊड मध्ये लावलेले होते. शिरीष गुणे हे दिनांक ९ जुलै रोजी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर आले असता त्यांना त्यांचे चारचाकी वाहन गायब झाल्याचे दिसले.
शिरीष गुणे यांनी त्यांच्या गाडीचा परिसरात शोध घेतला. मात्र गाडी मिळून आली नाही. कोणतरी अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर शिरीष भास्कर गुणे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ७५३/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
