Type Here to Get Search Results !

राहुरी - मुळा धरणावरील मत्स्य प्रकल्पातून दोन लाखांचा मुद्देमाल चोरी, पाच जणांवर गुन्हा दाखल.

 मुळा धरणावरील मत्स्य प्रकल्पातून दोन लाखांचा मुद्देमाल चोरी, पाच जणांवर गुन्हा दाखल.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालूक्यातील मुळानगर येथील धरणात असलेल्या मत्स्य पालन प्रकल्पातून चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान सुमारे दोन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडलीय. या बाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


सतीष भाऊसाहेब फुलसौंदर, वय ४० वर्षे, हे राहुरी शहरातील तनपूरेवाडी रोड येथे राहत आहेत. त्यांची बहीण स्वाती भाऊसाहेब फुलसौंदर यांचे नावावर मुळा धरणामध्ये निल क्रांती योजणे अंतर्गत केज प्रकल्प चार वर्षापासुन चालु आहे. त्याची देखरेख सतिष फुलसौंदर हे करीत आहेत. 


दि. ११ जून २०२३ रोजी सकाळी ८ वा. चे सुमारास सतिष फुलसौंदर यांना सदर मुळा धरणावरील साहित्य चोरी गेल्याची माहिती समजली. तेव्हा त्यांनी केज प्रकल्पावर जावून पाहणी केली. तेव्हा त्या ठिकाणी उचकापाचक झालेली दिसली. तसेच सोलर इनव्हर्टर, सोलर बटरी व पॅनल कॅमेरे, डीव्हीआर, केज साठी लागणारे पंटुन ( प्लास्टिक बॉक्स), प्लास्टीक जाळ्या, स्क्रीन असा सुमारे २ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरी गेल्याचे दिसले.


सतिष भाऊसाहेब फुलसौंदर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दादया पवार, आज्या बर्डे, सागर जवळे, गुलाब, मोरे(पुर्ण नाव माहिती नाही) सर्व रा. मुळानगर, ता. राहुरी ये पाच जणांवर संशयीत आरोपी म्हणून गुन्हा रजि. नं. ६८०/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केलाय.