Type Here to Get Search Results !

राहुरी - शेतात पाणि का सोडले, असे विचारल्याचा राग आल्याने दोघां मायलेकांना शिवीगाळ करुन मारहाण.

 शेतात पाणि का सोडले, असे विचारल्याचा राग आल्याने दोघां मायलेकांना शिवीगाळ करुन मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शेतात पाणि का सोडले, असे विचारल्याचा राग आल्याने दोघां मायलेकांना शिवीगाळ करुन खो-याच्या तूंब्याने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे घडलीय. 


रामप्रसाद अनिल घोलप, वय २७ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे राहत असून शेती व्यवसाय करतात. त्यांच्या शेता शेजारी पांडुरंग मोहन कदम याचे शेत आहे. दि. २२ जून रोजी सांयकाळी ६ वा. चे सुमारास रामप्रसाद घोलप यांच्या आई विजया ह्या शेतामध्ये सामाईक बांधावरुन आलेले चारीचे पाणी अडवत होत्या. तेव्हा त्यांना कळाले कि, पांडुरंग मोहन कदम याने पाणी सोडले आहे.


 तेव्हा त्यांनी पांडुरंग कदम याला बोलावुन घेतले आणि माझे शेतात पाणी का सोडले. असे विचारले असता त्याचा राग येउन त्याने शिवीगाळ करुन लोखंडी खोऱ्याचे तुंब्याने मारहान केली. तेव्हा रामप्रसाद यांची आई विजया ह्या सोडवण्यास आल्या असता त्यांनाही शिवीगाळ केली व तुला कोणाकडे जायचे तर जाय मी तुझ्याकडे बघुन घेतो अशी धमकी दिली आहे.


घटनेनंतर रामप्रसाद अनिल घोलप यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पांडुरंग मोहन कदम, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ६८३/२०२३ भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.