दुकान टाकण्यासाठी व घर खर्चासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
दुकान टाकण्यासाठी व घर खर्चासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी सासरच्या लोकांनी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना नाशिक येथे घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या चार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
धनश्री अनिकेत ठाकरे, वय २५ वर्षे, रा. शनि मंदीराजवळ कोठुळे, ता. निफाड, जि. नाशिक. आणि हल्ली राहणार राहुरी नगरपालिके समोर ता. राहुरी. या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीचे लग्न त्यांच्या नात्यातील अनिकेत अशोक ठाकरे, रा. कोठुळे, ता. निफाड, जि. नाशिक याच्या सोबत दि. १२ मे २०१८ रोजी राहुरी येथे झाले होते.
लग्नानंतर चार महीने धनश्री ठाकरे हिला सासरच्या लोकांनी व्यवस्थीत नांदवले. त्यानंतर दुकान टाकण्यासाठी व घर खर्चासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेवून ये. अशी मागणी करू लागले. तसेच शिवीगाळ करुन लाथा बुक्कयाने मारहाण करत धनश्री हिचा शारीरीक व मानसीक छळ करु लागले.
तु जर तुझ्या वडीलांकडुन तीन लाख रुपये आणले नाहीतर तुला मी नीट नांदवणार नाही. असे म्हणुन तीला उपाशीपोटी ठेवुन त्रास दिला. त्यानंतर तीची सासु मिनाबाई ही तुला व्यवस्थित स्वयपांक करता येत नाही. तु घरातील कामे व्यवस्थित करत नाही. असे म्हणुन धनश्री हिच्या सोबत कायम भांडण करत असत.
अखेर धनश्री अनिकेत ठाकरे या विवाहित तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तीच्या फिर्यादीवरून आरोपी पती- अनिकेत अशोक ठाकरे, सासु- मिनाबाई अशोक ठाकरे, नणंद- अश्विनी विशाल कांबळे, आत्या सासु- उषा वाडिले. सर्व रा. कोटुरे, ता. निफाड, जि. नाशिक. या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ६८८/२०२३ भादंवि कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
