पोलवर टाकलेला आकडा काढून घे. असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघां जणांना मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
पोलवर टाकलेला आकडा काढून घे. असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघां जणांना लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गज, लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील पिंपरी अवघड येथे दिनांक ५ जुलै रोजी घडलीय.
भागूबाई गंगाधर बाचकर, वय ३४ वर्षे, रा. पिंपरी अवघड, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ५ जुलै २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजे च्या सुमारास अर्जुन लहानू बाचकर हा भागूबाई बाचकर यांच्या घरासमोर आला होता.
तेव्हा भागूबाई बाचकर यांचे दीर लिंबाजी बाचकर हे त्यास म्हणाले की, तू विहीरी शेजारील पोलवर टाकलेला आकडा काढून घे. काल माझ्या भावजयला शॉक बसला होता. त्यावेळी अर्जुन बाचकर म्हणाला की, मी आकडा काढणार नाही. तूला काय करायचे ते कर. असे म्हणुन शिविगाळ दमदाटी केली.
त्यावेळी इतर आरोपी तेथे आले. त्यांनीही शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भागूबाई बाचकर, त्यांचा मुलगा संकेत व दिर लिंबाजी बाचकर या तिघांना आदोपींनी लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गज, लाकडी दांड्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सदर भांडणामध्ये भागूबाई बाचकर यांच्या गळ्यातील पोत व लिंबाजी बाचकर यांचा मोबाईल कोठेतरी पडुन गहाळ झालाय.
घटनेनंतर भागूबाई गंगाधर बाचकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अर्जुन लहानू बाचकर, अमोल अर्जुन बाचकर, गणेश अर्जुन बाचकर, भारत त्रिबंक बाचकर, सर्व रा. पिंपरी अवघड, ता. राहुरी. या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ७३६/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
