अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या दरम्यान तीच्या राहत्या घरातून अपहरण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील पश्चिमेकडील एका गावातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अज्ञात तरूणाने अपहरण केल्याची घटना दिनांक ४ जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान घडलीय.
या घटनेतील १६ वर्षे २ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह राहुरी तालूक्यातील पश्चिमेकडील एका गावात राहते. दि. ४ जुलै २०२३ रोजी रात्री त्या मुलीच्या घरातील लोक ११ वाजे दरम्यान नेहमी प्रमाणे झोपी गेले होते. दि. ५ जुलै २०२३ रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान घरातील लोक उठले.
तेव्हा त्यांना त्यांची मुलगी घरात दिसली नाही. त्यानंतर त्यांनी घरात, घराबाहेर तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती कुठेही मिळुन आली नाही. त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने अज्ञात कारणा करीता तीला पळवून नेवून तिचे अपहरण केले. अशी तीच्या घरच्या लोकांना खात्री झाली.
त्यानंतर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द फिर्याद दिली. त्यानूसार पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७३५/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
