Type Here to Get Search Results !

राहुरी - फेरी मारून मावा विक्री करणाऱ्यावर कारवाई करून गुन्हा दाखल.

 फेरी मारून मावा विक्री करणाऱ्यावर कारवाई करून गुन्हा दाखल.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलीस पथकाने तालुक्यात फेरी करून मावा विक्री करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून दीड किलो मावा जप्त करून त्याला गजाआड केले. ही कारवाई राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे दिनांक ५ जुलै २०२३ रोजी करण्यात आली. 


पोलिस नाईक आजीनाथ महादेव पाखरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ५ जुलै २०२३ रोजी सकाळी १९ वा. चे सुमारास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, खडांबे खुर्द ता. राहुरी येथे एक इसम महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला मावा सुपारी पिशवीमध्ये पायी विक्री करत आहे. 


पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशानूसार पोलिस नाईक आजिनाथ पाखरे, वाल्मीक पारधी, सचिन ताजणे, नदीम शेख, ढाकणे आदि पोलिस पथकाने खडांबे खुर्द शिवारात छापा टाकला. तेथे एक इसम खडांबे खुर्द गावात एका पिशवीमध्ये मावा घेऊन पायी फिरताना दिसला.


त्याला ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जाफर विबन सय्यद, वय ३२ वर्षे, रा. शिंगवे नाईक, ता. जि. अहमदनगर. असे सांगितले. त्याची झडती घेतली असता सदर पिशवीमध्ये ९०० रूपये किंमतीचा दिड किलो मावा मिळून आला. 


पोलिस नाईक आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जाफर विबन सय्यद, वय ३२ वर्षे, रा. शिंगवे नाईक, ता. जि. अहमदनगर. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ७३४/२०२३ भादंवि कलम १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.