Type Here to Get Search Results !

राहुरी - गुटख्यासह सुमारे ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकजण गजाआड.

 गुटख्यासह सुमारे ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकजण गजाआड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलीस पथकाने तालुक्यातील गुहा परिसरात छापा टाकून एका तरुणाला गुटखा विक्री करताना रंगेहाथ पकडून त्याला गजाआड केले. तसेच त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


पोलिस नाईक सचिन विठ्ठल ताजणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ५ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजे दरम्यान हवालदार ज्ञानदेव गर्जे, पोलिस नाईक आजिनाथ पाखरे, नदिम शेख, ढाकणे आदि पोलिस पथक राहुरी तालूक्यातील गुहा गावामध्ये गस्त घालीत होते. 


त्यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळालेल्या गुप्त खबरी वरून त्यांनी सदर पोलिस पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावेळी सिध्दार्थ कैलास लुटे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी. हा मोटरसायकलवर महाराष्ट्रात प्रतिबंध करण्यात आलेले सुगंधी तंबाखु व गुटखा विक्री करत असताना आढळून आला. 


पोलिस पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ हिरा, विमल तसेच एक मोटरसायकल असा एकूण ५३ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच आरोपीला गजाआड केले. 


पोलिस नाईक सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सिध्दार्थ कैलास लुटे, वय २४ वर्षे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ७३७/२०२३ भादंवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.