तूमचा पुतण्या माझ्याकडे कायम रागाने पाहतो. असे म्हणाल्याचा राग आल्याने तरूणाला बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तूमचा पुतण्या माझ्याकडे कायम रागाने पाहतो. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी प्रशांत तमनर व त्याच्या वडिलांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील गोटूंबे आखाडा येथे दिनांक २ जुलै २०२३ रोजी घडलीय.
प्रशांत गंगाधर तमनर, वय २२ वर्षे, हा तरूण राहुरी तालूक्यातील गोटुंबे आखाडा येथे त्याच्या कुटुंबासह राहतो. दिनांक २ जुलै २०२३ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास प्रशांत तमनर हा त्याच्या घरा शेजारी राहणारे उमेश कोडिंबा बाचकर यांना म्हणाला की, तुमचा पुतण्या अरुण कारभारी बाचकर हा माझ्याकडे कायम रागाने बघत असतो.
तुम्ही त्याला समजुन सांगा. असे म्हणाल्याचा राग आल्याने तो मला म्हणाले की, तुमची आमच्या शेजारी राहण्याची लायकी नाही. असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने, प्लॉस्टिक खुर्चीने मारहाण केली. तसेच ब्लेड मारून जखमी केले. त्यावेळी प्रशांत तमनर याचे वडील भांडण सोडवीण्यासाठी आले. तेव्हा त्यांना देखील धक्काबुक्की करुन मारहाण केली.
तसेच परत आमचे नादी लागले तर तुम्हाला जिवे मारुन टाकु, अशी धमकी दिली. त्या भांडणात प्रशांत याचे पाकीट व त्याच्या आईचे मनी मंगळसूत्र गहाळ झाले आहे. घटनेनंतर प्रशांत गंगाधर तमनर याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्याच्या फिर्यादीवरून आरोपी कारभारी कोंडीबा बाचकर, अरुण कारभारी बाचकर, अमर कारभारी बाचकर, उमेश कोंडिबा बाचकर, चौघे रा. गोंटुबे आखाडा, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७२७/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
