पोलिसांत फिर्याद दिल्याचा राग मनात धरुन लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली. असे म्हणत आरोपींनी किशोर कदम व त्यांच्या कुटुंबीयांना लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना दिनांक २ जुलै २०२३ रोजी राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे घडलीय.
किशोर भाउसाहेब कदम, वय ४० वर्षे, रा. पिंपरी अवघड ता. राहुरी. हे दि. २ जुलै २०२३ रोजी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभा होते. त्यावेळी जून्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी तेथे आले. आणि तूम्ही आमचे विरुध्द पोलीसांत तक्रार का दिली. असे म्हणून किशोर कदम यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्कयाने व लाकडी दांड्याने मारहाण केली.
तेव्हा भांडण सोडवण्यासाठी किशोर कदम यांची आई चंद्रकला, वडील भाउसाहेब, पत्नी जयश्री, मुलगी स्मिता हे आले असता त्यांनाही लाथा बुक्क्याने मारहाण करुन तूम्ही पून्हा आमचे नादी लागले तर तुमचा एकएकाचा काटा काढु, असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी केली. या मारहाणीत किशोर कदम यांना जबर मार लागल्याने त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किशोर भाउसाहेब कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी रेवन्नाथ भानुदास वैरागर, जामवंत भगत वैरागर, कविता आंबादास वैरागर, सविता राधाकिसन वैरागर, राधाकिसन जगन्नाथ वैरागर, सोनाली रेवन वैरागर, आंबादास भानुदास वैरागर, सर्व रा. पिंप्री अवघड, ता. राहुरी. व दोन अनोळखी इसम नाव गाव माहीत नाही.
अशा नऊ जणांवर गुन्हा रजि. नं. ७३१/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
