शेतातील विहिरीवर यायचे नाही, असे म्हणून पती पत्नीला बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शेतातील विहिरीवर यायचे नाही, असे म्हणून आरोपींनी दोघा पती पत्नीला लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक ५ जुलै २०२३ रोजी राहुरी तालूक्यातील पिंपरी अवघड येथे घडलीय.
पुजा अमोल बाचकर, वय २७ वर्षे, ही विवाहित तरूणी तीच्या कुटुंबासह राहुरी तालूक्यातील पिंपरी अवघड येथील बाचकर वस्तीवर रहावयास आहे. दि. ५ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुजा बाचकर व तीचे पती दोघेजण त्यांच्या घरा शेजारील शेतात चारा काढीत होते.
तेव्हा आरोपी त्यांच्या घराचे पाठीमागे आले. आणि म्हणाले कि,
तुम्ही आमचे शेतातील विहिरीवर यायचे नाही. असे म्हणून शिविगाळ दमदाटी करू लागले. तेव्हा पुजा बाचकर हिचा पती म्हणाला कि, ही आपली सामाईक विहिर आहे. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी दोघा पती पत्नीला शिवीगाळ करत लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.
तसेच तूम्ही परत जर विहिरीवर दिसले तर तुला व तुझ्या पतीला जीवे ठार मारून टाकु. अशी जीवे मारण्याची धमकी दिली. सदर भांडणात पुजा बाचकर हिच्या गळ्यातील पोत खाली पडुन गहाळ झाली आहे. घटनेनंतर पुजा अमोल बाचकर या विवाहित तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
तीच्या फिर्यादीवरून आरोपी संकेत गंगाराम बाचकर, लिंबाजी अर्जुन बाचकर, साहिल लिंबाजी बाचकर, भागुबाई गंगाराम बाचकर, सर्व रा. पिंप्री अवघड, बाचकर वस्ती, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७३३/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
