पोलीस पथकाने कारवाई करून ६०० रुपये किमतीचा एक किलो मावा जप्त केला.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
पोलीस पथकाने दिनांक ४ जुलै रोजी राहुरी तालुक्यातील धामोरी येथे एका पान टपरीवर छापा टाकून ६०० रुपये किमतीचा एक किलो मावा जप्त केलाय. तसेच एका जणांवर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले.
पोलिस नाईक रोहीदास शंकर नवगीरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ४ जुलै २०२३ रोजी ११.३० वाजे दरम्यान पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, धामोरी, ता. राहुरी येथे रोडचे कडेला येथे एक इसम महाराष्ट शासनाची बंदी असलेली पान सुपारी हा अवैद्य रित्या त्याचे टपरी मध्ये मावा सुपारी विक्री करत आहे.
तेव्हा पोलिस निरीक्षक जाधव यांच्या आदेशावरून सहाय्यक फौजदार बऱ्हाटे, पोलिस नाईक रोहीदास नवगीरे, वाल्मीक पारधी, अमित राठोड, सचिन ताजणे, ढाकणे आदि पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
तेथे एक इसम धामोरी गावचे शिवारात रोडचे कडेला टपरीमध्ये महाराष्ट्र शासनाची बंदी असलेली पान सुपारी हा अवैद्यरित्या जवळ बाळगताना दिसल्याने त्याला ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन शाम जंगम, वय ३० वर्षे, रा. धामोरी ता. राहुरी. असे सांगीतले.
तेव्हा पोलिस पथकाने त्याच्या पान टपरीची झडती घेतली असता सदर ठिकाणी एका प्लास्टीकचे पिशवीमध्ये ६०० रूपये किंमतीचा एक किलो मावा असल्याचे दिसले. पथकाने सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिस नाईक रोहीदास शंकर नवगीरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन शाम जंगम, रा. धामोरी, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ७३०/२०२३ भादंवि कलम १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
