Type Here to Get Search Results !

राहुरी - मला खूप आवडतेस, तू मला भेटायला येत जा. असे म्हणून आरोपीने तरूणीचा हाथ पकडून....

 मला खूप आवडतेस, तू मला भेटायला येत जा. असे म्हणून आरोपीने तरूणीचा हाथ पकडून....



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


२३ वर्षीय विवाहित तरूणीच्या घरात घुसून तू मला खूप आवडतेस, तू मला भेटायला येत जा. असे म्हणून आरोपीने तरूणीचा हाथ धरून तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना राहुरी तालूक्यातील दरडगाव थडी येथे घडलीय. 


या घटनेतील २३ वर्षीय विवाहित तरूणी ही राहुरी तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या एका गावात तीच्या कुटुंबासह राहते. दिनांक ५ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान ती तीच्या घरात एकटी असताना आरोपी समिर बर्डे हा तीच्या घरात घूसला. 


मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू मला खूप आवडतेस, मला भेटायला येत जा. असे म्हणून आरोपीने त्या तरूणीचा हाथ धरून ओढले. नंतर तीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यावेळी तरूणीचे सदर घटने बाबत तीच्या पतीला सांगितले. तेव्हा तीच्या पतीने आरोपीला सदर घटनेचा जाब विचारला. 


याचा राग आल्याने आरोपीने तरूणीच्या पतीला शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तीच्या फिर्यादीवरून आरोपी समिर रावसाहेब बर्डे, रा. दरडगाव थडी, ता. राहुरी.


याच्यावर गुन्हा रजि. नं. ७३८/२०२३ भादंवि कलम ३५४ (अ), ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रामनाथ सानप हे करीत आहेत.