Type Here to Get Search Results !

राहुरी - दोघी मायलेकिंनी मिळून दोघां मायलेकाला शिवीगाळ करत विळ्याने मारून जखमी केले.

 दोघी मायलेकिंनी मिळून दोघां मायलेकाला शिवीगाळ करत विळ्याने मारून जखमी केले.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शेतात आलेल्या शेळ्या हाकलून लावल्या. या कारणावरून दोघी मायलेकिंनी मिळून दोघां मायलेकाला शिवीगाळ करत विळ्याने मारून जखमी केले. ही घटना राहुरी तालूक्यातील बारागांव नांदूर येथे दिनांक २ जुलै रोजी घडलीय. 


महेश शिवाजी गाडे, वय २१ वर्षे, हा तरूण राहुरी तालूक्यातील बारागांव नांदूर येथे त्याच्या कुटुंबासह राहत आहे. त्याचे चुलते संभाजी कृष्णाजी गाडे हे त्यांचे कुटुंबांसह शेजारीच राहत आहे. दि. २ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजे दरम्यान महेश गाडे व त्याची आई सुनिता दोघेजण बारगांव नांदूर शिवारातील त्यांच्या शेतातील घास कापीत होते. 


तेव्हा त्यांच्या शेतातातील ऊसात त्याचे संभाजी कृष्णाजी गाडे यांच्या शेळ्या आल्याने दोघे मायलेक त्या शेळ्या शेतातून बाहेर हाकलीत असताना तेथे महेश गाडे याची चुलती संगीता गाडे व चुलत बहीण वैशाली गाडे ह्या तेथे आल्या. म्हणाल्या की, तुम्ही आमच्या शेळ्या का हाकलुन दिल्या. असे म्हणुन शिवीगाळ करु लागल्या.


 त्यावेळी महेश गाडे त्यांना म्हणाला की, तुम्ही तुमच्या शेळ्या बांधुन ठेवा. त्या आमचे पिकामध्ये येत आहेत. असे म्हणत असताना त्यांनी शिवागाळ करत आता तुमच्याकडे पाहते. असे म्हणून त्यांनी महेश गाडे व त्याची आई सुनिता यांना विळ्याने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की करुन जिवे मारण्याची धमकी दिली.


घटनेनंतर महेश शिवाजी गाडे याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून वैशाली संभाजी गाडे व संगीता संभाजी गाडे, दोघी रा. बारगांव नांदूर, ता. राहुरी. या दोघींवर गुन्हा रजि. नं. ७२२/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.