केल्याचे भाडे मागीतले म्हणून रिक्षा चालकास लाथा बूक्क्यांनी, लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
रिक्षात बसून प्रवास केल्याचे भाडे मागीतले म्हणून रिक्षा चालक अमर बाचकर यास लाथा बूक्क्यांनी, लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण करून जिवे मारण्याची देण्यात आली. ही घटना दिनांक २ जुलै रोजी राहुरी तालूक्यातील गोटूंबे आखाडा येथे घडलीय.
अमर कारभारी बाचकर, वय २९ वर्षे, हा तरूण रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. तो राहुरी तालूक्यातील गोटूंबे आखाडा येथे त्याच्या कुटुंबासह राहतो. दि. २ जुलै २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अमर बाचकर हा त्याची रिक्षा घेऊन राहुरी कडुन गोटुंबे आखाडा तेथे घराकडे जात होता.
तेव्हा शिंगणापूर फाटा येथे आरोपी प्रशांत गंगाधर तमनर हा रिक्षात बसला. अमर बाचकर याने त्याला रिक्षातून गोटूंबे आखाडा येथे सोडले. आणि प्रवासाचे भाडे मागितले. तेव्हा प्रशांत तमनर म्हणाला कि, मी तुला प्रवासाचे भाडे देणार नाही. आणि शिवीगाळ करुन धक्काबूक्की केली.
त्यावेळी अमर बाचकर याचे वडील व भाऊ हे भांडण सोडवण्यास आले व समजावून सांगत होते. तेव्हा इतर आरोपी तेथे आले. त्यांनी अमर बाचकर व त्याचे वडिल आणि भावाला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व लाकडी काठी व लोखंडी गजाने मारहाण केली.
तसेच आमचे नादी लागले तर तुम्हाला जिवे मारुन टाकू. अशी धमकी दिली. घटनेनंतर अमर कारभारी बाचकर याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत गंगाधर तमनर, अक्षय गंगाधर तमनर, गंगाधर चिमाजी तमनर, गयाबाई गंगाधर तमनर सर्व रा. गोटूंबे आखाडा, राहुरी.
यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७२५/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
