Type Here to Get Search Results !

राहुरी - बिबट्याच्या तावडीतून भावंडांचा जीव वाचविणाऱ्या श्रद्धा गागरेचा यथोचित सत्कार

 बिबट्याच्या तावडीतून भावंडांचा जीव वाचविणाऱ्या श्रद्धा गागरेचा यथोचित सत्कार.



मा. उषाताई तनपूरे कडून श्रद्धाच्या धाडसाचे कौतुक व जखमी भावंडांची विचारपुस.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


बिबट्याच्या तावडीतून आपल्या भावंडांना वाचविणाऱ्या श्रद्धा गागरे हीच्या कुटुंबीयांचा जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे यांनी राहुरी तालूक्यातील कानडगाव येथे जाऊन सत्कार केला. 


कानडगाव येथे राहणाऱ्या श्रद्धा भाऊसाहेब गागरे हिने मागील आठवड्यात बिबट्याच्या तावडीतून आपले बंधू कुणाल व तेजस यांना वाचविले होते. श्रद्धा गागरे हिच्या धाडसाचे कानडगावसह सर्वत्र कौतुक करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या व राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे यांनी कानडगाव येथे जाऊन गागरे कुटुंबीयांची भेट घेतली.


 यावेळी श्रद्धा हिच्या धाडसाचे सौ. तनपुरे यांनी कौतुक केले. श्रद्धा हिचे बंधू कुणाल व तेजस यांच्या प्रकृतीचीही त्यांनी चौकशी केली. यावेळी भाऊसाहेब गागरे व कुटुंबीयांचा सौ. तनपुरे यांनी यथोचित सत्कार केला . 


यावेळी डॉ. रवींद्र गागरे, सोपानराव हिरगळ, प्रभाकर धोंडे, पांडूभाऊ लोंढे, मच्छिंद्र गागरे, एकनाथ गागरे, किरण गागरे, जावेदभाई सय्यद, सिताराम गागरे, अण्णा नेहे, रामकिसन गागरे, पोपटराव गागरे, भाऊसाहेब रंगनाथ गागरे, आण्णा नेहे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.