पोलिस पथकाने कारवाई करून ४ किलो मावा जप्त करून एकावर गुन्हा दाखल केलाय.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी पोलिस पथकाने तालूक्यातील वांबोरी येथे दिनांक १ जुलै २०२३ एका पान टपरीवर कारवाई करून सुमारे चार हजार रुपए किंमतीचा सुगंधी मावा जप्त करून एका जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सतिष संजय कु-हाडे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १ जुलै २०२३ रोजी ५.३० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वांबोरी डेहरे कमानीजवळ एक इसम महाराष्ट शासनाची बंदी असलेला मावा अवैद्य रित्या त्याचे टपरीमध्ये विक्री करत आहे.
त्यानंतर पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशावरून पोलिस नाईक सतिष कु-हाडे, दिनकर चव्हाण, सचिन ताजणे, पो.काँ. ढाकणे, पो.काॅ. पालवे आदि पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता एक इसम टपरीच्या आडोशाला मावा विक्री करताना आढळून आला.
त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रामचंद्र विष्णु को-हाळे, वय २८ वर्षे, रा. देहरे कमान, वांबोरी, ता. राहुरी. असे सांगीतले. त्याचे पान टपरीची झडती घेतली असता त्या ठिकाणी ४ हजार रुपए किंमतीचा ४ किलो मावा मिळून आला.
पोलिस नाईक सतिष संजय कु-हाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामचंद्र विष्णू को-हाळे, रा. वांबोरी, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ७२०/२०२३ भादंवि कलम १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
