लोखंडी कत्ती घेऊन फिरणाऱ्या तरूणावर आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
धारदार लोखंडी कत्ती जवळ बाळगत असलेल्या तरूणाला राहुरी पोलिस पथकाने तालूक्यातील बारागांव नांदूर येथे ताब्यात घेतले आणि गजाआड केले. ही घटना दिनांक ३० जून २०२३ रोजी घडली असून पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राहुरी येथील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशानूसार पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पोलिस नाईक सचिन ताजणे, भाऊसाहेब शिरसाठ, प्रमोद ढाकणे, अजिनाथ पाखरे आदि पोलिसांचे पथक दिनांक ३० जून २०२३ रोजी सायंकाळच्या दरम्यान गस्त घालत होते.
त्यावेळी एक इसम धारदार लोखंडी कत्ती घेऊन फिरत आहे. अशी पोलिस पथकाला गुप्त खबर मिळाली. पोलिस पथकाने राहुरी तालूक्यातील बारागांव नांदूर येथील स्मशानभूमी परिसरात छापा टाकला. त्यावेळी तेथे एक इसम संशयित रित्या फिरत असताना दिसून आला.
पथकाने त्याला पकडून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ एक धारदार लोखंडी कत्ती मिळून आली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे नाव विनायक गणपत बर्डे, वय २३ वर्षे, रा. बारगांव नांदुर, ता. राहुरी. अशी त्याने माहिती दिली.
पोलिस नाईक सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनायक गणपत बर्डे, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ७१४/२०२३ शस्त्र अधिनियम १९५९ कलम २५/४ प्रमाणे आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
