पाणि पुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाचे सुमारे दोन लाख रूपए किंमतीचे पाईप चोरट्यांनी पळवीले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे सुरू असलेल्या सहा गाव पाणि पुरवठा योजनेंतर्गत कामाचे सूमारे दोन लाख रूपए किंमतीचे पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिनांक २९ जून २०२३ रोजी उघडकीस आले. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वाल्मीक शांताराम चौधरी, वय ४३ वर्षे, रा. जळगाव, ता. जि. जळगाव. हल्ली मुक्काम बिरोबानगर, राहुरी. हे विजय कंस्ट्रक्शन परळी वैजिनाथ, जि. बीड यांचेकडे सुपरवायझर म्हणुन काम करतात. त्यांचे ब्राम्हणी सहा गाव पाणी पुरवठा योजने अंतर्गत ब्राम्हणी ता. राहुरी येथे काम चालु आहे.
पाणीपुरवठा योजणे अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले श्री पाईप्स कंपनीचे काळ्या रंगाचे ८६ डी. आय. पाईप ब्राम्हणी येथील गजानन ट्रेडर्स दुकानाचे बाजुला ठेवलेले होते. वाल्मीक चौधरी हे यांनी दि. २९ जून २०२३ रोजी सकाळी ब्राम्हणी येथील सुरू असलेल्या कामास भेट देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणचे १ लाख ९० हजार रुपए किंमतीचे ८६ पाईप चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर वाल्मीक शांताराम चौधरी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ७१६/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
