दुसरे लग्न करण्यासाठी संमती द्यावी, म्हणून विवाहित तरूणीचा शारिरीक व मानसिक छळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
लग्नामध्ये मानपान दिला नाही, फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत तसेच दुसरे लग्न करण्यासाठी संमती द्यावी. अशा विविध मागण्यासाठी एका २६ वर्षीय विवाहित तरुणीचा तिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडलीय. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मोनाली सचिन फंड, वय २६ वर्षे, रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी. या विवाहित तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, मोनाली फंड हिचे लग्न दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी संगमनेर तालूक्यातील शेडगाव येथील सचिन पांडुरंग फंड यांचेशी झाला होते. लग्नानंतर मोनाली हिला सात ते आठ दिवस सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदविले.
तेव्हा तीचा पती नोकरी निमीत्त मुंबई येथे राहत होता. तर मोनाली ही सासरी शेडगाव ता. संगमनेर येथे सासु सासरे सोबत राहवयास होती. त्यावेळी लग्नामध्ये मानपान दिला नाही म्हणून सासरे लोक मोनाली हिला मानसिक त्रास देत होते. मोनाली हिचा पती गावाकडे आला असता मुंबईवरुन एका महिलेचा वारंवार फोन यायचा.
त्याबाबत मोनाली हिने तीच्या पतीला विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. लग्ना करता तु सही कर. या कारणावरून मोनाली हिला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच दादर, मुंबई येथील सायली चांदे हि मोनाली हिस फोन करुन मला म्हणाली की, तु लग्नाचे संमती पत्रावर सही कर. मला तुझ्या पतीशी लग्न करता येईल. तु सही केली नाहीतर तुला जिवे ठार मारुन टाकीन, अशी धमकी दिली.
तसेच मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख रूपए घेऊन ये आदि मागण्यांसाठी आरोपींनी मोनाली सचिन फंड या विवाहित तरूणीला उपाशी पोटी ठेवुन तीचा शारीरीक व मानसिक छळ केला. त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर तीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून आरोपी पती- सचिन पांडुरंग फंड, सासरा- पांडुरंग सखाहरी फंड, सासु- रुख्मिनी पांडुरंग फंड, भाया- अमोल पांडुरंग फंड, वर्षा अमोल फंड, सर्व रा. शेडगाव ता. संगमनेर. तसेच सायली चांदे रा. दादर, मुंबई. या सहा जणांवर गुन्हा रजि. नं. ७१७/२०२३ भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
