Type Here to Get Search Results !

राहुरी - शहरातील विलास डावखर यांची दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या.

 शहरातील विलास डावखर यांची दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहरातील शिलाई मशीन चे व्यापारी विलास दामोधर डावखर यांनी काल दिनांक ३ जुलै रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. 


विलास दामोदर डावखर, वय ५२ वर्षे, रा. शिवाजी चौक, राहुरी. हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल दिनांक ३ जुलै २०२३ रोजी रात्री ११.३० वाजे दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. 


सदर घटना लक्षात येताच त्यांना ताबडतोब रूग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. विलास डावखर यांच्यावर आज दिनांक ४ जुलै रोजी दुपारी शहरातील गणपती घाट येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 


यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. विलास डावखर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


विलास डावखर यांनी नेमक्या कोणत्या कारणावरुन आत्महत्या केली. हे मात्र समजू शकले नाही. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.