Type Here to Get Search Results !

राहुरी - पोलिस पथकाने छापा टाकून दारूचा साठा जप्त करून एकाला गजाआड केले.

 पोलिस पथकाने छापा टाकून दारूचा साठा जप्त करून एकाला गजाआड केले.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलिस पथकाने दिनांक २९ जून २०२३ रोजी राहुरी फॅक्टरी परिसरात छापा टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमास मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याला गजाआड केले. 


पोलिस नाईक प्रशांत भागवत पवार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशाने पोलिस नाईक एस बी निकम, सचिन ताजने, प्रशांत पवार आदि पोलिस पथकाने दिनांक २९ जून २०२३ रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात नगर मनमाड रोड लगत हॉटेल यशच्या पाठीमागे छापा टाकला.


त्यावेळी तेथे परमेश्वर पुट्या पुजारी हा इसम देशी विदेशी दारुची चोरुन विक्री करत असताना मिळुन आला. त्याच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ४ हजार २०० रूपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केलाय. 


पोलिस नाईक प्रशांत भागवत पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर पुट्या पुजारी, रा. साई पार्क बिल्डींग, साकूरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ७१२/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.