Type Here to Get Search Results !

राहुरी - एलसीबी पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकून एकाला ताब्यात घेतले.

एलसीबी पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकून एकाला ताब्यात घेतले.




राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने राहुरी येथील विद्यापीठ परिसरात मटका अड्ड्यावर छापा टाकलाय. या कारवाईत मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दिनांक २७ जून २०२३ रोजी करण्यात आली. 


अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील पोलिस नाईक सागर अशोक ससाणे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहेर यांच्या आदेशाने पोलिस नाईक भिंगारदे, येमुल, बाळासाहेब खेडकर, सागर ससाणे आदि पोलिस पथक दिनांक २७ जून २०२३ रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. 


त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, राहुरी विद्यापीठ बस स्थानक जवळ टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जीतीचा मटका जुगार लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे देवुन त्यांचे कडुन पैसे घेवुन खेळत व खेववित आहे. त्यावेळी पोलिस पथकाने राहुरी येथील पोलिस नाईक गणेश सानप यांना बरोबर घेऊन ताबडतोब विद्यापीठ स्थानक परिसरात छापा टाकला. 


त्यावेळी पोलिस पथकाने मटका घेणाऱ्या इसमास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण वसंत सोनवणे, वय ३८ वर्षे, रा. डीग्रस ता. राहुरी. असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात रोख रक्कम व मटका खेळविण्यासाठी लागणारे साधने मिळुन आली.


पोलिस नाईक सागर अशोक ससाणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी प्रविण वसंत ससाणे, रा. डिग्रस, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ७०७/२०२३ महाराष्ट्र जूगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.