Type Here to Get Search Results !

राहुरी - तडीपार असलेल्या गुन्हेगाराला पून्हा तडीपार करून गुन्हा दाखल करण्यात आला.

 तडीपार असलेल्या गुन्हेगाराला पून्हा तडीपार करून गुन्हा दाखल करण्यात आला.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील सराईत गुन्हेगार स्वप्निल नामदेव कुसमूडे याला अहमदनगर जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी तडीपार केलेले असताना देखील तो राहुरी येथे राहत होता. पोलिस पथकाला त्याची खबर मिळताच त्याला २७ जून २०२३ रोजी पहाटेच्या दरम्यान त्याला ताब्यात घेऊन पून्हा तडीपार केले. 


गेल्या महिन्यात राहुरी येथील भारत ढोकणे, ओंकार डहाके, शिवा नागरे व स्वप्निल कुसमूडे या चार सराईत गुन्हेगारांना जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशाने १८ महिन्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पारित केले होते. त्यानूसार राहुरी पोलिस पथकाने सदर चार गुन्हेगारांना ताब्यात घेऊन अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेर सोडून दिले होते. 


मात्र या चार गुन्हेगारां पैकी स्वप्निल नामदेव कुसमूडे हा तडीपार असताना देखील राहुरी येथे राहत होता. सदर माहिती गुप्त खबऱ्या मार्फत पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळाली. 


त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पोलिस शिपाई असिफ शेख, महेश शेळके, जानकिरा खेमनर, अशोक शिंदे, पोलिस नाईक बागुल, रामनाथ सानप, आवारे, अमित राठोड, आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे, दादासाहेब रोहकले, नदीम शेख, कांबळे, गणेश लिपणे, जयदिप बडे, ढाकणे, दिगंबर सोनट्टके, सागर नवले, महिला पोलिस नाईक कोळेकर, गुंजाळ, जवरे आदि पोलिस पथकाने दिनांक २७ जून २०२३ रोजी पहाटे १ वाजेच्या दरम्यान राहुरी शहरातील डावखर खळवाडी येथे छापा टाकला. 


पोलिस पथकाने स्वप्निल कुसमूडे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलिस नाईक नदिम शेख यांच्या फिर्यादीवरून स्वप्निल नामदेव कुसमूडे याच्यावर गुन्हा रजि. नं. ७०५/२०२३ महाराष्ट्र अधिनियम १९५१ कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्याला पून्हा अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.