बहिण व भाचीला घेऊन जाण्यास नकार दिल्याने मेहुण्याला लाथा बुक्क्याने व लाकडी काठीने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
बहिण व भाचीला घेऊन जाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने मेहुण्याला शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने तसेच लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे दिनांक २५ जून २०२३ रोजी घडली.
विकास दिनकर पाळंदे, वय ४५ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील निंभेरे येथे त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत. दि. २५ जून २०२३ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान त्यांचा मेव्हूना विश्वास माऊली दिवे, रा. दाढ, ता. संगमनेर. हा भेटण्याकरीता निंभेरे येथे आला होता. त्यावेळी विकास पाळंदे व विश्वास दिवे दोघेजण निंभेरे येथुन त्यांच्या वस्तीवर जात होते.
तेव्हा विश्वास दिवे हा विकास पाळंदे यांना म्हणाला कि, मी बहीन दिपाली व भाचीला गावाकडे घेवुन जाणार आहे. त्यावेळी विकास पाळंदे हे त्याला म्हणाले कि, थोडे दिवस थांबा नंतर घेवुन जा. असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने त्याने विकास पाळंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबूक्क्याने व लाकडी काठीने मारहान केली.
त्यानंतर तो म्हणाला कि, मी माझ्या बहीणीला गावी घेवुन जाणार आहे. तुला काय कराचे ते करुन घे. तु जर मध्ये आला तर तुला जिवे मारुन टाकीन, अशी धमकी देऊन त्याची बहीण व भाचीला घेऊन गेला.
घटनेनंतर विकास दिनकर पाळंदे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विश्वास माऊली दिवे, रा. दाढ, ता. संगमनेर. याच्यावर गुन्हा रजि. नं. ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
