Type Here to Get Search Results !

राहुरी - शेत जमीनीची नांगरट करण्यास मज्जाव केल्याने लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.

 शेत जमीनीची नांगरट करण्यास मज्जाव केल्याने लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शेत जमीनीची नांगरट करण्यास मज्जाव केल्याने आरोपींनी बहिण भावाला लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील सात्रळ येथे दिनांक १० जुलै रोजी घडलीय. 


स्वाती लक्ष्मण शेळके, वय ३७ वर्षे, या राहुरी तालूक्यातील सात्रळ येथील त्यांच्या माहेरी असताना दि. १० जुलै २०२३ रोजी ३.३० वा. सुमारास त्यांच्या वडील आबासाहेब भगवंत नालकर यांच्या शेतात एकनाथ सुरसे रा. गाडकवाडी, ता. राहुरी. हा त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर आणून नागरट करीत होता. 


तेव्हा स्वाती शेळके यांची बहिण अर्चना सर्जेराव हारदे व भाऊ अविनाश आबासाहेब नालकर हे त्यांच्या शेतात चालू असलेली नांगरट थांबविण्यास गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच शेतातील उभे मकाचे पिक ट्रॅक्टरचे सहाय्याने नांगरुन नुकसान केले.


तसेच तुम्ही जर ट्रॅक्टरला आडवे आलात तर तुम्हाला एका एकाला ट्रॅक्टर खाली घालुन जिवे ठार मारु. अशी जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर स्वाती लक्ष्मण शेळके यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) सचिन वेणुनाथ शिंदे, रा. कणकापूर, ता. संगमनेर. २) एकनाथ गंगाधर सुरसे, रा. सात्रळ, ता. राहुरी. ३) कल्पना अनिल खलदकर, रा. सात्रळ, ता. राहुरी. ४) विजया सचिन शिंदे, रा. कणकापूर, ता. संगमनेर. ५) ज्योती एकनाथ सुरसे, रा. सात्रळ, ता. राहुरी.  ६) सुमन यशवंत नालकर, रा. सात्रळ, ता. राहुरी. 


या सहा जणांवर गुन्हा रजि. नं. ७६६/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.