Type Here to Get Search Results !

राहुरी - मायलेकिला लाथा बूक्क्यांनी मारहाण, नणंद भावजयवर गुन्हा दाखल.

 मायलेकिला लाथा बूक्क्यांनी मारहाण, नणंद भावजयवर गुन्हा दाखल.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


घरात सुरू असलेल्या भांडणात दोघी नणंद भावजयने मिळून दोघी मायलेकीला लाथा बूक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी शहरात दिनांक ११ जुलै २०२३ रोजी घडली असून दोघींवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


शोभा विनोद जगताप, वय ४० वर्षे, रा. मल्हारवाडी रोड, इंगळे इस्टेट, राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, शोभा विनोद जगताप, भाऊ विनोद लाला पंडित व मनिषा लाला पंडित यांच्या वडीलोपार्जीत संपत्तीचा खटला अहमदनगर येथील न्यायालयात चालू आहे. 


दि. ११ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वा. चे सुमारास शोभा जगताप या घरात भांडण सुरू असल्याचे समजताच घरात गेल्या. तेव्हा त्यांच्या घरामध्ये त्यांची बहीण मनिषा लाला पंडित व भावजाई शितल विनोद पंडीत दोघी मिळून शोभा जगताप यांच्या मुलीला लाथा बुक्क्याने मारहाण करत होत्या. त्यावेळी शोभा जगताप यांनी त्यांना विचारले कि, माझ्या मुलीला का मारता. 


तेव्हा मनिषा पंडित व शितल पंडित यांनी शोभा जगताप व त्यांच्या मुलीला लाथा बूक्क्यांनी मारहाण करून घर लवकरात लवकर खाली कर. नाहीतर तुला जिवे ठार मारुन टाकीन. अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. 


घटनेनंतर शोभा विनोद जगताप यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार आरोपी मनिषा लाला पंडित व शितल विनोद पंडीत यांचे विरुद्ध गुन्हा रजि. नं. ७६०/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.