दोघां मायलेकाकडून सचिन कोपनर यास लाकडी दांड्याने मारहाण व धमकी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तूला जास्त झाले आहे, तूला चाकूने खूपसुन टाकीन, नीट राहा नाहीतर तुला गाडीखाली घालुन मारुन टाकीन अशी जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील तमनर आखाडा येथे दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी घडलीय.
सचिन सोपान कोपनर, वय २५ वर्षे, रा. तमनर आखाडा, ता. राहुरी. हा तरूण दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास तमनर आखाडा येथील मोरया मेडिकल समोर उभा होता. तेथे तमनर आखाडा येथील लंकाबाई दशरथ पांढरे ही महिला आली. आणि सचिन कोपनर याला घाणघाण शिवीगाळ केली.
त्यावेळी सचिन कोपनर तीला म्हणाला कि, मला शिव्या का देताय? असे म्हणाल्याचा राग आल्याने तीने सचिन कोपनर यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. आणि तेथून निघून गेली. त्यानंतर तिथे लंकाबाई पांढरे हिचा मुलगा यशवंत दशरथ पांढरे आला. व मला म्हणाला की तूला जास्त झाले आहे, तूला चाकूने खूपसुन टाकीन, नीट राहा नाहीतर तुला गाडीखाली घालुन मारुन टाकीन. अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
सचिन सोपान कोपनर याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी लंकाबाई दशरथ पांढरे व यशवंत दशरथ पांढरे, दोघे रा. तमनर आखाडा, ता. राहुरी. या मायलेकावर गुन्हा रजि. नं. ८६०/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
