Type Here to Get Search Results !

राहुरी - विवाहित तरूणीला घरात घुसून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी.

 विवाहित तरूणीला घरात घुसून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


काही एक कारण नसताना एका विवाहीत तरूणीला घरात घुसून आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. ही घटना राहुरी तालूक्यातील गुहा येथे दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी घडलीय. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


शितल सुदर्शन इरुळे, वय २५ वर्षे, ही विवाहीत तरूणी तीच्या कुटुंबासह राहुरी तालूक्यातील गुहापाट, ता. राहुरी. येथे राहते. दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान सदर विवाहीत तरूणी घरात असताना आरोपी अनाधिकृतपणे घरात घुसले. आणि शितल इरुळे या विवाहित तरूणीला काही एक कारण नसताना शिवीगाळ केली. 


तसेच तूझ्याकडे आता पाहतो. असे म्हणुन मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर शितल सुदर्शन इरुळे या विवाहित तरूणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी सतिश रामदास इरुळे, अलका सतिश इरुळे, सुनिल हरिभाऊ इरुळे, भास्कर हरिभाऊ इरुळे, निलेश भास्कर इरुळे, सर्व रा. गुहापाट, ता. राहुरी.


या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. ८६७/२०२३ भादंवि कलम ३२३, ४५२, ५०४, ५०६, १४३, १४७ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.