Type Here to Get Search Results !

राहुरी - नूकसान भरपाईचा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे महसूल प्रशासनाला निवेदन.

 नूकसान भरपाईचा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे महसूल प्रशासनाला निवेदन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


सन २०२२- २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राहुरी तालूक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नूकसान झाले. प्रशासना मार्फत त्याचे पंचनामे देखील झाले. मात्र अद्याप तालूक्यातील काही शेतकऱ्यांना नूकसान भरपाई मिळाली नाही. या संदर्भात आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी तालूक्यातील दवणगाव येथील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिले.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सन २०२२- २०२३ मध्ये राहुरी तालूक्यासह दवणगाव येथे प्रचंड अतिवृष्टी झाली होती. इतर गावांना त्या नूकसान भरपाईचा मोबदला रोख स्वरूपात मिळाला. मात्र दवणगाव येथील एकाही शेतकऱ्याला नूकसान भरपाईचा मोबदला मिळाला नाही.


या बाबत तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालून गारपीटची नूकसान भरपाई दवणगाव येथील शेतकऱ्यांना मिळवून द्यावी. असे निवेदनात म्हटले आहे. 


दिलेल्या निवेदनावर प्रदिप होन, भानुदास पांडागळे, सुर्यभान जऱ्हाड, राजेंद्र डूकरे, अरूण खपके, गेणूदास होन, सर्जेराव होन, सुभाष खपके, रवींद्र खपके, जालिंदर पांडागळे, आण्णासाहेब खपके, संजय कासार आदिंच्या सह्या आहेत.