हिंदू जन आक्रोश मोर्चामुळे राज्य महा मार्गावरील वाहतूकीत बदल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथे उद्या दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकल हिंदु समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चामध्ये १० हजारच्या आसपास हिंदू जनसमुदाय हजर राहण्याची शक्यता आहे. मोर्चा राहुरी शहरातील वाय.एम.सी. मैदान येथून निघणार असून पूढे धावडे पेट्रोल पंप, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक, शनि चौक, नवीपेठ या मार्गे निघून जूने ग्रामीण रुग्णालय समोर सभा घेतल्या नंतर मोर्चाची सांगता होणार आहे.
सदर जन आक्रोश मोर्चा च्या अनुषंगाने नगर मनमाड महामार्गावर मोठया प्रमाणावर गर्दी जमा होणार वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच मोर्चाकरीता येणारी वाहने महामार्गालगत पार्किंग होणार आहेत. त्याच प्रमाणे मोर्चाची सांगता झाल्यानंतर परत जाणारे मोर्चेकरी व त्यांचे वाहनांमुळे मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होणार आहे.
त्यामुळे नगर, शिर्डी, मनमाड महामार्गावरील सर्व वाहतुक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. ते दुपारी ३ वा. पर्यंत पर्यायी मार्गाने वळविणे बाबतचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी जारी केले आहे.
त्यानूसार नगरकडुन राहुरी मार्गे शिडी मनमाडकडे जाणारे अवजड वाहनांकरीता पर्यायी मार्ग म्हणून नगर, विळद बायपास दुध डेअरी चौक शेंडी बायपास, नेवासा, श्रीरामपुर बाभळेश्वर मार्गे शिर्डी, मनमाड असा वाहतूकीत बदल करण्यात आलाय.
