Type Here to Get Search Results !

राहुरी - माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ.

 माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


टेम्पो घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे घडली असून सासरच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.


तब्बसूम फिरोज पठाण, वय ३७ वर्षे, रा. सडे, ता. राहुरी. हल्ली रा. खंडाबे खुर्द, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, तब्बसूम फिरोज पठाण यांचा विवाह दिनांक १५ जानेवारी २००६ रोजी राहुरी तालूक्यातील खडांबे खुर्द येथील फिरोज हसन पठाण याच्याशी झाला होता. 


लग्न झाल्यानंतर सुरवातीचे पाच वर्ष सासरच्या लोकांनी तब्बसूम पठाण यांना व्यवस्थित नांदवले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे पती फिरोज याने व्यवसायासाठी टेम्पो विकत घ्यावयाचा असल्याने तूझ्या भावाकडून पाच लाख रुपये घेवून ये. असे पत्नीला सांगीतले. 


त्यावेळी तब्बसूम पठाण यांनी पतीला सांगीतले कि, माझे भाऊ गरीब आहेत. त्यांनी लग्नात तुम्हाला दागदागिने व संसारउपयोगी साहित्य दिलेले आहे. आता मी माझ्या भावांना पैसे मागु शकत नाही. असे म्हणाल्याचा पतीला राग येवुन त्याने पत्नीला मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवले.


त्यानंतर तु पाच लाख रुपये तुझ्या घरच्याकडुन घेवुन ये, नाहीतर तुझ्या भावाच्या जमिनीत वाटा घे. असे सांगीतले. तेव्हा तब्बसूम यांच्या भावाने फिरोज पठाण याला ७० हजार रुपए दिले होते. त्यांनतर सासरच्या लोकांनी काही दिवस तब्बसूम यांना व्यवस्थित नांदवले.


पंरतु काही दिवसांनी तब्बसूम यांनी पून्हा पाच लाख रूपए माहेरहून आणावेत. या मागणीसाठी सासरच्या लोकांनी त्यांचा शारिरिक व माननीय छळ करत शिवीगाळ व मारहाण करू लागले. तब्बसूम फिरोज पठाण यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 


त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती- फिरोज हसन पठाण, सासु- सायरा हसन पठाण, सासरे- हसन नन्नुभाई पठाण, दिर- अमजद हसन पठाण, जाव- आयेशा अमजद पठाण, चुलत सासरे- बबन नन्नुभाई पठाण, चुलत दिर- आसीफ यासीन पठाण, चुलत दिर- युनुस बबन पठाण, जाव- शबाना सलीम पठाण सर्व रा. सडे, ता. राहुरी. 


या नऊ जणांवर गुन्हा रजि. नं. ८३३/२०२३ भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे शारिरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.