महावितरण कामकाजाच्या अनेक त्रुटी बाबत आ. प्राजक्त तनपूरे यांनी विधानसभेत प्रश्न मांडले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली लोंबकळल्याने शेतकऱ्याचे मृत्यू झालेले आहेत. त्या प्रकरणी व महावितरण मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर माजी ऊर्जा राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी विधान सभेत प्रश्न उपस्थित केला. प्रश्नावरील या चर्चेत सहभागी होत, याबाबत उपाययोजना करण्यासंबंधी ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचेकडे मागणी केली.
विधानसभेत आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी महावितरणच्या बाबतीत काही तक्रारी उपस्थित करताना राज्यात विविध ठिकाणी फिरताना असे आढळून आले आहे की, विजेच्या तारा खाली लोंबकळत असल्याने त्याला हात लागल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे.
ह्या एखाद्या ग्रामीण भागात विशेषतः एका जिल्ह्यात अश्या शेकडो नव्हे तर हजारो घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या हजारो तक्रारी असून महावितरण त्यावर देखभाल दुरुस्तीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करते. ज्या वेळी आम्ही फिरत असतो. त्यावेळी ह्या बाबत शेतकरी तक्रार करतात. पण त्यावेळी महावितरणचे अधिकाऱ्यांना खूप वेळा सांगूनही हा प्रश्न मार्गी लावत नसल्याचे चित्र आहे.
अनेक वेळा सांगितल्यावर हे काम करतात. मग प्रश्न असा पडतो, महावितरण ह्या साठी जो शेकडो कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करते तर हा पैसा जातो कुठे? असा प्रश्न करून राज्यात अश्या लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्तीचा कार्यक्रम ह्या निधीतून हाती घ्यावा. अशी मागणी उप मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री ह्यांना केली.
दुसरा एक प्रश्न मांडताना आमदार प्राजक्त तनपूरे म्हणाले की, महावितरणने आऊट सोर्सिंगच्या कामासाठी कंत्राटी मंजूर भरले असून त्यांचेकडे कोणतेही लायसन्स नसताना त्यांना विजेच्या खांबावर चढून कामे करून घेतली जातात. असे काम करताना जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाची जी ससे होलपळट होते. ती त्या बाबत शासन काय कार्यवाही करणार, असा प्रश्न उपस्थित केला असता त्यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या प्रश्न मार्गी लावला जाईल, असे उत्तर दिले.
आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी महावितरण चा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा प्रश्नोत्तराचा तास संपत आल्याने उप मुख्यमंत्री ह्यांनी त्यावर आक्षेप घेत विधानसभा अध्यक्षानी प्रश्नोत्तराचा तास संपला असे जाहीर करावे. विधानसभेला विधान परिषदे सारखी सवय लावू नये. असे सांगितल्यावर अध्यक्ष ह्यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे जाहीर केले.
पण त्याबरोबर उप मुख्यमंत्री ह्यांनी तनपुरे ह्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेच पाहिजे. अशी भूमिका मांडताच उप मुख्यमंत्री ह्यांनी आपण तनपुरे ह्यांच्या प्रश्नाचे निश्चित उत्तर देऊ, असे सांगून तनपुरे ह्यांना वेळ अध्यक्ष नार्वेकर ह्यांनी वाढवून दिली.
