जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्याकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा मार्गाची पाहणी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी राहुरी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी आज दिनांक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी राहुरी येथे भेट देऊन मोर्चा मार्गाची पाहणी करून पोलिस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
राहुरी तालूक्यातील उंबरे येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायदा संपुर्ण देशात लागू करण्यात यावा. यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सदर मोर्चा हा शहरातील वाय एम सी ग्राउंड येथुन निघणार असून धावडे पेट्रोल पंप, शुक्लेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनी चौक या मार्गे निघून मोर्चाची सांगता नवीपेठ येथील जूने ग्रामीण रुग्णालय समोर होणार आहे. तसेच जुने ग्रामीण रुग्णालय समोर हिंदू जन जागृती विषयक जाहिर सभा घेण्यात येणार आहे.
या अनुषंगाने आज जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी राहुरी शहरातील मोर्चा मार्गाची पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मोर्चा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून पोलिस प्रशासनाची शहरात व परिसरात करडी नजर असणार आहे.
यावेळी श्रीरामपूर येथील पोलीस उप अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलिस फौजफाटा उपस्थित होते.

