झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे सोन्याचे दागीने चोरट्याने पळवीले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
रात्रीच्या दरम्यान घरा समोरील ओट्यावर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र व पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील वरशिंदे येथे दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी घडली.
बापु विठ्ठल नेहे, वय ६७ वर्षे, रा. वरशिंदे, ता. राहुरी. हे दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १०.३० वाजे दरम्यान जेवन केल्या नंतर बापु नेहे व त्यांची पत्नी सिताबाई हे दोघे त्यांच्या घराच्या बाहेरील ओट्यावर झोपले होते. त्यानंतर पहाटे ३ वाजे दरम्यान सिताबाई या झोपेत असताना त्यांच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व सोन्याची पोत कोणीतरी अज्ञात भामट्याने ओढुन तो पळुन गेला.
सिताबाई यांना जाग आल्यावर त्यांनी घरातील इतर लोकांना उठवीले. त्यांनी भामट्याचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र तो दिसून आला नाही. घटनेनंतर सिताबाई यांचे पती बापु विठ्ठल नेहे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ९१७/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
