Type Here to Get Search Results !

राहुरी - राष्ट्रीय पातळीपर्यंत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले

 राहुरी

     खेळाडूंना विविध नोकऱ्यांमध्ये व शिक्षणासाठी देखील आरक्षण आहे. आपली गुणवत्ता दाखवून जे खेळाडू आपल्या खेळामध्ये चमकले आहेत अशा खेळाडूंना त्याचा फायदा नक्कीच झालेला आहे त्यामुळे खेळाडूंनी पूर्ण क्षमतेने खेळामध्ये झोकून देत आपल्या परिसराचा नावलौकिक वाढवावा व आपली चमक राष्ट्रीय पातळीपर्यंत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले आहे.



      याबाबत माहिती अशी कीराहुरी फॅक्टरी येथील शिवनेरी क्लब च्या प्रांगणामध्ये नुकतीच पुणे विभागीय शूटिंग बॉल अजिंक्य पद निवड चाचणी पार पडली या या स्पर्धेचे उद्घाटन साई आदर्श मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे व राहुरी अर्बन पतसंस्थेचे प्रशांत काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कन्हेरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कोल्हापूर येथील सदाशिव माने हे उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये मुलांच्या संघांमध्ये अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा तसेच पुणे जिल्हा येथील मुलींनी सहभाग घेतला होता तसेच मुलींच्या संघांमध्ये अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील मुलींनी सहभाग घेतला होता.

       यावेळी बोलताना शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले कीशिवनेरी क्लबच्या माध्यमातून राहुरी फॅक्टरी व परिसराला अनेक नामवंत खेळाडू मिळालेले आहेत मात्र आर्थिक पाठबळ नसल्यामुळे खेळाडूंना काही विषयांमध्ये वंचित राहावे लागते मात्र यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतलेला आहे या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून सर्वतोपरी आर्थिक मदत देण्याची आमची तयारी आहे. त्यांनी संकोच न बाळगता आपल्या ला हवे असलेले आम्हास सांगावे. मात्र खेळामध्ये आपली गुणवत्ता त्यांनी दाखवून द्यावी. पुणे विभागातील अनेक खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत गुणवंत खेळाडूंची नक्कीच निवड होणार आहे या निवडीसाठीच नव्हे तर येणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी आमच्या या सर्वच खेळाडूंना शुभेच्छा आहेत.

     या विभागीय स्पर्धा येत्या दोन व तीन सप्टेंबर रोजी देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती हायस्कूल व जुनिअर कॉलेज या ठिकाणी होणारा असून यासाठी ही निवड चाचणी घेण्यात आली होती.

       या निवड चाचणीसाठी शूटिंग बॉल असोसिएशनचे जिल्हा सचिव राजेंद्र पुजारीतुपेचंद्रकांत तायडे संदीप निबे पुरनाळे साहेब गागरे सर कुर्हे सर रोहिदास वाघमारे यांच्यासह शिवनेरी क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.