Type Here to Get Search Results !

राहुरी - भाडोत्री दिलेली बैलगाडी व भाडे मागीतले म्हणून तरूणाला लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण

 भाडोत्री दिलेली बैलगाडी व भाडे मागीतले म्हणून तरूणाला लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


भाडोत्री दिलेली बैलगाडी व भाडे घेण्यासाठी आलेल्या रवी ऊर्फ अजय बर्डे या तरूणाला लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी राहुरी तालूक्यातील मानोरी येथे घडलीय. 


रवी ऊर्फ अजय संजय बर्डे, वय २८ वर्षे, रा. देसवंडी, ता. राहुरी. या तरूणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, पोपट भाऊसाहेब जाधव, रा. मानोरी, ता. राहुरी. याने रवी ऊर्फ अजय बर्डे याच्याकडून दोन दिवसासाठी बैलगाडी भाडोत्री घेतली होती. 


दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १०.३० वाजे दरम्यान रवी ऊर्फ अजय बर्डे व त्याचा भाऊ अक्षय हे दोघेजण त्यांच्या वॅगनर कार नं. एम एच ०२ बिटी ६३५० ह्या गाडीत बसुन पोपट भाऊसाहेब जाधव याच्या घरी मानोरी येथे बैलगाडी आणण्यासाठी गेले. आणि बैलगाडी व भाडे मागीतले. 


तेव्हा आरोपी त्याला म्हणाला कि, मी तुला बैलगाडी देणार नाही. असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच तु आत्ताच्या आत्ता येथुन जा. नाहीतर तुला व तुझ्या भावाचा काटाच काढुन टाकु. अशी धमकी दिली.  त्यानंतर आरोपींनी रवी ऊर्फ अजय बर्डे याच्या वँगनर कारच्या टायरची हवा सोडुन बोनटवर दांड्याने मारुन नुकसान केले आहे.


घटनेनंतर रवी ऊर्फ अजय संजय बर्डे याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी पोपट भाऊसाहेब जाधव, शरद बर्डे, अरुण जाधव, सागर जाधव, सर्व रा. मानोरी, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. ९२४/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.