स्त्यावरुन ये जा करण्यास मज्जाव केल्याने पोपट जाधव यांना लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
घरासमोरील रस्त्यावरुन ये जा करण्यास मज्जाव केल्याने पोपट जाधव यांना लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील मानोरी येथे दिनांक १९ ऑगस्ट रोजी घडलीय.
पोपट भाऊसाहेब जाधव, वय ३६ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील मानोरी येथील मोरेवस्ती रहावयास आहेत. त्यांची शेती मुळा नदीपात्रा लगत असुन घरासमोरुन शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता केलेला आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १०.३० वाजे दरम्यान आरोपी हे तिन बैलगाड्या व वँगनर कार नं. एम एच ०२ बिटी ६३५० ही गाडी घेवुन जात असतांना दिसले.
तेव्हा पोपट जाधव त्यांना म्हणाले की, तुम्ही आमचे घरासमोरुन जाणाऱ्या रस्त्याने तुमच्या गाड्या घेवुन जावु नका हा रस्ता आमचा आहे. याचा राग आल्याने आरोपींनी पोपट जाधव यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने व लाकडी दांड्याने मारहाण केली.
तसेच तूला काय करायचे ते कर, तु जर आमचे नादी लागला तर तूला जिवे मारुन टाकु. अशी धमकी दिली. तेव्हा भांडणाचा आवाज ऐकुन पोपट जाधव यांची पत्नी सुमन व चुलत भाऊ सागर भाऊराव जाधव हे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. आणि तुम्ही जर आमचे नादी लागले तर तुमचा एक एकाचा बेतच पाहतो. अशी धमकी देऊन निघुन गेले.
त्यानंतर पोपट भाऊसाहेब जाधव यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय बर्डे, अक्षय बर्डे, दोघे रा. देसवंडी, ता. राहुरी तसेच काशिनाथ चव्हाण, सचिन चव्हाण, दोघे रा. तांदुळवाडी, ता. राहुरी. या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
