Type Here to Get Search Results !

राहुरी - भूयारी गटार योजना कामाचे भूमिपुजन ना. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते संपन्न होणार.

 भूयारी गटार योजना कामाचे भूमिपुजन ना. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते संपन्न होणार.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथे राहुरी नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर अंतर्गत राहुरी शहर भुयारी गटार) योजनेचा (किंमत १३४ कोटी ९८ लक्ष पैकी पहिला टप्पा ) रक्कम रु. ९२ कोटी ९८ लक्ष या कामाचा भूमिपुजन समारंभ रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या शुभहस्ते होणार आहे. 


तर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खा. डॉ. सुजय विखे, माजी आ. चंद्रशेखर कदम, जेष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


राहुरी नगर परिषद अंतर्गत सदर भुयारी गटार योजनेसाठी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या कार्यक्रमास डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ हे देखील उपस्थितीत राहणार आहे. 


सदर योजना मंजूर करण्यासाठी राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) यादवराव तनपुरे यांनी वेळोवळी पुरावा करून त्या योजनेसाठी १३४ कोटी ९८ लक्ष निधी मंजूर करून आणला आहे. या कार्यक्रमासाठी राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व राहुरी तालुक्यातील विकास मंडळाचे सर्व कार्यकर्ते व शहारातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी केलेले आहे.


यावेळी माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, माजी विरोधी पक्षनेते डॉ. धनंजय मेहेत्रे, शिवाजी डौले, प्रकाश पारख, शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, शहराध्यक्ष गंगाधर सांगळे, चांगदेव भोंगळ, रंगनाथ तनपुरे, भाजप शहराध्यक्ष राजेंद्र उंडे, सुरेश भुजाडी, सुभाष वराळे, भाऊसाहेब काकडे, मधुकर पोपळघट, आबासाहेब येवले, अजित डावखर, सचिन मेहेत्रे, सुजय काळे, ज्ञानेश्वर पोपळघट, गोपाळ अग्रवाल, अक्षय तनपुरे, संदीप भोंगळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.