हीलिंग लाईव्हस संस्थेच्या महाराष्ट्र टिमने तिसरा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी केला साजरा
"रक्तदान शिबिराचे आयोजन ६४ रक्तदात्यांनी केले रक्तदान"
शिक्रापूर प्रतिनिधी (सुनिल पिंगळे)
रक्तदान करुया मानवधर्म वाढवूया ही संकल्पना घेऊन रांजणगाव गणपती मंदिर या ठिकाणी हीलिंग लाईव्हस महाराष्ट्र टीम व रुबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात तब्बल ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.या कार्यक्रमासाठी हीलिंग लाईव्हस संस्थेच्या सेक्रेटरी रेशमी कुलकर्णी हया दुबई वरून कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहील्या होत्या त्यांनी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. पांडुरंग आण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद येथील शाळेतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.निमगाव भोगी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयात स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच काही विद्यार्थ्यांना संस्थेने दत्तक घेतले आहे व त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत संस्था करणार आहे.निमगाव भोगी येथे मागील तीन वर्षांपासून संस्था सातत्याने वृक्षारोपण करून त्या वृक्षांची निगा राखत आहे.वात्सल्यसिंधु फाऊंडेशन निर्मित उड्डाण प्रकल्पाद्वारे महिला समूहाच्या स्वयंनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम ही या निमित्ताने भरविण्यात आला होता.मोफत आरोग्य तपासणी शिबिर ही आयोजित करण्यात आले होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आण्णापूर येथील शाळेत संगीत वादनाचे साहित्य भेट देण्यात आले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्या व महागणपती देवस्थानच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर, सचिव व हीलिंग लाईव्हस महाराष्ट्र टिमचे प्रोग्राम हेड डॉ तुषार पाचुंदकर पाटील, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर,सामाजिक कार्यकर्ते व ग्रंथालय संघ शिरूर तालुका अध्यक्ष विवेकानंद फंड, हर्षददादा जाधव जिल्हाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी, माजी सरपंच संजय पावशे, सरपंच किरण झंजाड,मनोज अमृतकार,नंदराज निंबोरे, उपसरपंच सुषमा बढे,उषाताई वाखारे, श्रीकांत कालेकर, साहेबराव शिवले, विनायक फंड,बलीराम नामदे, संदीप झंजाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र चीफ झोन संतोष सांबारे,सुनील पडवळ, संतोष शेवाळे, अविनाश सांबारे, संदीप सांबारे,स्वप्निल फलके, उज्वला इचके, नीता लोखंडे, अमृता फलके, विवेकानंद बढे, पूजा सांबारे, पृथ्वीराज सांबारे व इतर सर्व हीलिंग लाईव्हस संस्थेच्या टीमने विशेष प्रयत्न केले.
