सबळ पूराव्या अभावी अपहरणच्या गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील पाथरे खुर्द, गांवचे शिवारातील मुलीस तिचे पालकांचे संमतीशिवाय लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पालकांचे रखवालीतून पळवून नेले. या आरोपातून आरोपी रवि उर्फ रविंद्र सुभाष गांगुर्डे, रा. पाथरे खुर्द याची नुकतीच अहमदनगर येथील जिल्हा व सेशन न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी सविस्तर हकीकत अशी की, मौजे पाथरे खुर्द, ता. राहुरी या गांवचे शिवारात फिर्यादी यांचे राहते घराचे समोर दि. २९/०४/२०१७ रोजी फिर्यादीची मुलगी हिस लग्नाचे आमिष दाखवनू तिचे पालकांचे संमती शिवाय कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. त्यानुसार फिर्यादी याने राहुरी पोलीसात फिर्याद दिली व पोलीसांनी आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३६३, ३६६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पोलीसांनी सदर गुन्हयाचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले. व सदर खटला अहमदनगर येथील जिल्हा व सेशन कोर्ट श्रीमती एम. ए. बरालिया यांचे समोर चालली. सदर खटला मे. कोर्टात चालून सबळ पुराव्या अभावी आरोपी रवि उर्फ रविंद्र सुभाष गांगुर्डे याची दि. १९/०८/२०२३ रोजी मे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे जेष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक ॲड. प्रकाश संसारे यांनी काम पाहिले.
