Type Here to Get Search Results !

राहुरी - कांदा गोणीमध्ये भरण्यास नकार दिल्याने आई व पत्नीला लोखंडी तूंब्याने मारहाण.

 कांदा गोणीमध्ये भरण्यास नकार दिल्याने आई व पत्नीला लोखंडी तूंब्याने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शेतातील कांदा गोणीमध्ये भरण्यास नकार दिल्याने निलेश दरेकर याने आई व पत्नीला खलबत्याचा लोखंडी तूंब्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील वांबोरी परिसरात दिनांक १६ ऑगस्ट रोजी घडलीय. 


सुरेखा निलेश दरेकर, वय ३० वर्षे, रा. मोरेवाडी, वांबोरी, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजे च्या सुमारास सुरेखा दरेकर यांचे पती त्यांच्या आईला व पत्नीला म्हणाला की, तुम्ही दोघेजणी आज कांद्याच्या गोण्या भरा.


 तेव्हा आई मुलगा निलेश याला म्हणाल्या की, तुझे वडील आत्ताच मयत झाले आहेत. त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण कांदे भरु. असे म्हणाले असता मुलगा निलेश याने घरातील खलबत्याचा लोखंडी तुंबा घेउन कांद्याची जाळी तोडु लागला. तेव्हा आई त्याला म्हणाली की, तु जाळी तोडु नको व कांदे भरण्याची घाई करु नको.


 असे म्हणाल्याचा राग आल्याने मुलगा निलेश याने आईला व पत्नीला लोखंडी तुंबा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सुरेखा निलेश दरेकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती निलेश हौशीराम दरेकर रा. मोरेवाडी, वांबोरी ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ९०९/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय