भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला शिवीगाळ करत लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला शिवीगाळ करत लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना दिनांक १ ऑगस्ट रोजी राहुरी तालूक्यातील बारागांव नांदूर येथे घडलीय. याबाबत दोघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वनिता महेश कोहकडे, वय ३० वर्षे, रा. बारागांव नांदुर, ता. राहुरी. या दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजे दरम्यान बारगांव नांदुर शिवारात त्यांच्या शेतात काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणारे स्नेहल अमोल शहाणे, अमोल रत्नाकर शहाणे आणि आरोपी शांताबाई गाडे व विकास गाडे यांच्यात भांडण सुरू होते.
वनिता कोहकडे या त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या. तेव्हा आरोपींनी त्यांना शिविगाळ करत तू आमच्या मध्ये कशाला आली आहेस. तुझा काही संबंध नाही. असे म्हणत शिवीगाळ करु लागले. त्यावेळी वनिता कोहकडे त्यांना म्हणाल्या की, तूम्ही स्नेहल शहाणे व अमोल शहाणे यांचेशी वाद घालू नका.
असे म्हणल्याचा राग आल्याने आरोपींनी वनिता कोहकडे यांना शिविगाळ करत तुझ्याकडे पाहतो. असे म्हणत त्यांना लाथा बूक्क्यांनी माराहन करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. घटनेनंतर वनिता महेश कोहकडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शांताबाई लक्ष्मण गाडे, विकास लक्ष्मण गाडे, दोघे रा. बारागांव नांदुर, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ८३८/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
