Type Here to Get Search Results !

राहुरी - पो. उप. निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याला तात्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन- विलास साळवे

 पो. उप. निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याला तात्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन- विलास साळवे.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


बलात्कार च्या गून्ह्यात फरार असलेला आरोपी सज्जन नाऱ्हेडा याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. सदर घटनेला आठ दिवस झाले, अद्याप आरोपीला अटक झाली नाही. आरोपीला तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी आज आरपीआय च्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.


राहुरी तालुक्यात एका गरीब महिलेवर आरोपी पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याने दिनांक १७ जुलै २०२३ रोजी बलात्कार केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. आरोपी नाऱ्हेडा याला अटक करण्यासाठी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालूकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिस ठाण्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.


 दरम्यान आरोपीच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता. तेव्हा जिल्हा न्यायालयाने आरोपी सज्जन नाऱ्हेडा याचा तात्पूरता जामीन मंजूर केला होता. त्या जामीन अर्जावर १२ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा न्यायालयातील महिला न्यायाधिश माधुरी अनुप बरालीया यांच्या समोर सुनावणी झाली. पिडीत महिलेच्या वतीने ॲड. स्नेहल लोखंडे व ॲड. अनिल डोखे यांनी काम पहिले. 


त्यांनी फिर्यादीच्या वतीने बाजू मांडुन आरोपीच्या जामीन अर्जावर तीव्र आक्षेप नोंदवीला. महिला न्यायाधिश माधुरी अनुप बरालीया यांनी आरोपी पोलिस उप निरीक्षक सज्जन किसन नाऱ्हेडा याचा जामीन रद्द केला. यासाठी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालूकाध्यक्ष विलास साळवे, कुमार भिंगारे यांनी पाठपुरावा केला.


आरोपीचा जामीन रद्द होऊन आठ दिवस झाले. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. आरोपी पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याला तात्काळ अटक करावी. अन्यथा आरपीआय च्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिलेल्या निवेदनात दिलाय. 


आरपीआय तालूकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे, तालूकाध्यक्ष सुनिल चांदणे, विवेक सगळगीळे, सागर साळवे, राजू दाभाडे, राजू बागुल, मयुर सुर्यवंशी, गणेश कोकाटे, अजिज इनामदार, रवींद्र शिरसाठ, दुर्गेश वाघ आदिंच्या सह्या आहेत.