Type Here to Get Search Results !

राहुरी - आण्णासाहेब त्रिभुवन यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण.


 

आण्णासाहेब त्रिभुवन यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


माझ्याकडे पाहून शिवीगाळ का करता, असे म्हणून तिघां जणांनी मिळून आण्णासाहेब त्रिभुवन यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी स्टेशन रोड परिसरातील गावठाण येथे दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी घडलीय. 


आण्णासाहेब मारुती त्रिभुवन, वय ५० वर्षे, रा. राहुरी स्टेशन गावठान रोड, राहुरी ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आण्णासाहेब त्रिभुवन यांच्या घरा शेजारी मच्छिंद्र आनंदा जाधव हा त्याच्या कुटुंबासाह राहत असुन त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे.


दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९ वा. चे सुमारास आण्णासाहेब त्रिभुवन हे त्यांच्या घरी असताना पत्नी वंदना हीचे सोबत घरगुती कारणावरुन त्यांचे वाद चालु होते. तेव्हा शेजारी राहणारा मच्छिंद्र आनंदा जाधव हा दारु पिलेल्या अवस्थेत तेथे आला व म्हणाला की, तुम्ही मला शिवीगाळ का करता?


 त्यावेळी आण्णासाहेब त्रिभुवन त्यास म्हणालो की, आमचे नवरा बायकोचे घरगुती कारणावरुन वाद चालु आहे. आम्ही तुम्हाला कशाला बोलु, असे म्हणाले असता, तो म्हणाला की, तुम्ही आम्हाला पाहुन शिव्या दिल्या आहेत. असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन आता तुमच्याकडे पाहतो. असे म्हणुन तो हाथात कुऱ्हाड घेवुन त्याचे मुलांसोबत आला.


आणि आण्णासाहेब त्रिभुवन यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथा बूक्क्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करुन दुखापत केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर आण्णासाहेब मारुती त्रिभुवन यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी मच्छिंद्र आनंदा जाधव, प्रसाद मच्छिंद्र जाधव, बाळु मच्छिंद्र जाधव, रा. राहुरी स्टेशन, गावठान रोड, ता. राहुरी. या तिघांवर गून्हा रजि. नं. ११७६/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.