अडीच तोळे सोन्याचे दागीने, चार मोबाईल व १५ हजार रुपए रोख रक्कम भामट्यांनी पळवीली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील उंबरे येथे दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात दोन भामट्यांनी चांगदेव ढोकणे यांच्या घरात धाडसी चोरी करून अडिच तोळे सोन्याचे मंगळसुत्र, चार मोबाईल व १५ हजार रुपए रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडलीय.
चांगदेव ज्ञानदेव ढोकणे हे राहुरि तालूक्यातील उंबरे येथे राहत आहेत. दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांना घरातील भांडी वाजल्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. त्यावेळी वडीलांनी चोर चोर असा आरडा ओरडा केला.
तेव्हा चांगदेव ढोकणे यांनी घरातून बाहेर येवुन पाहीले असता एक इसम पळुन जाताना पाहीला. त्यावेळी चांगदेव ढोकणे व त्यांचा भाऊ बाबासाहेब हे त्याच्या पाठीमागे पळाले. पुढे एकजन थांबलेला होता. तेव्हा दोन्ही भामटे तेथुन पळुन गेले.
त्यानंतर चांगदेव ढोकणे यांनी घरी येवुन पाहीले असता. घरातील चार मोबाईल, १५ हजार रुपए रोख रक्कम तसेच कपाटात ठेवलेली गळ्यातील आडीच तोळ्याची सोन्याची पोत असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल सदर भामट्यांनी चोरुन नेल्याचे दिसले.
चांगदेव ज्ञानदेव ढोकणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात दोन भामट्यां विरोधात गून्हा रजि. नं. ११८०/२०२३ भादंवि कलम ३८०, ४५७, ३४ प्रमाणे चोरीचा गून्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
