Type Here to Get Search Results !

राहुरी - सामाईक विहिरीवरील मोटर चालू करण्याच्या कारणावरुन दगड व बांबूने मारहाण.


 


सामाईक विहिरीवरील मोटर चालू करण्याच्या कारणावरुन दगड व बांबूने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


सामाईक विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या शिवाजी जाधव यांना तिघां जणांनी मिळुन दगडाने व लाकडी बांबुने मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील कणगर येथे दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी घडलीय. 


शिवाजी सदाशिव जाधव, वय ४३ वर्षे, रा. कणगर खुर्द, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, राहुरी तालूक्यातील वडनेर शिवारातील शेत गट नं. १५० मध्ये सामाईक विहीर आहे. त्यात शिवाजी सदाशिव जाधव, चांगदेव गोपिनाथ दिवे, सुरेश रामभाऊ घाडगे असे आम्ही सामाईक विहीरीत हीस्सेदार आहेत.


शिवाजी जाधव हे दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजे दरम्यान सामाईक विहीरीवर मोटार चालु करण्यासाठी गेले असता तेथे आरोपी उभा होते. त्यावेळी आरोपी गणेश हा म्हणाला की, हा गट नं. माझ्या ताब्यात आहे. तु मोटार चालु करायची नाही. असे म्हणुन आरोपींनी शिवाजी जाधव यांना शिवीगाळ करत दगडाने व लाकडी बांबुने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. 


घटनेनंतर शिवाजी सदाशिव जाधव यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश हरिभाऊ गोसावी, विकास हरिभाऊ गोसावी, अशोक रघुनाथ माळी, सर्व रा. कनगर, ता. राहुरी. या तिघांवर गून्हा रजि. नं. ११८१/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.