Type Here to Get Search Results !

राहुरी - ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणारी ग्रामपंचायत निवडणुक रद्द व्हावी

 ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणारी ग्रामपंचायत निवडणुक रद्द व्हावी.



निवडणूकीवर बहिष्कार घालून निवडणूक रद्द करण्यासाठी २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालूक्यातील मुसळवाडी येथील ग्रामपंचायतची निवडणूक मतदान प्रकीया ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. मात्र तेथील आदिवासी व इतर ग्रामस्थ निवडणूकीवर बहिष्कार घालून २ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन आज महसूल प्रशासनाला देण्यात आले. 


महसूल प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालूक्यातील मुसळवाडी येथील आदिवासी व इतर काही लोक मुसळवाडी परिसरातील पाटबंधारे विभागाच्या जागेत गेल्या ४० ते ५० वर्षापासून राहत आहेत. त्या ठिकाणी सुमारे १ हजार ते ११०० मतदार आपल्या कुटुंबासह राहवयास आहेत. 


परंतू त्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांना निवडणूकीमध्ये त्यांच्या मताचा उमेदवार देता येत नाही. गेल्या ४० ते ५० वर्षापासून सदर जागा तूमच्या नावावर करून देतो, असे गाव पुढाऱ्यांकडून आश्वासन देण्यात आले. परंतू निवडणूक झाल्यानंतर कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. सदर जागा ही पाट बंधारे विभागाची असल्याने त्या जागेत घरकुल अथवा शासकीय योजना मिळत नाहीत. 


त्यामुळे शासनाने सदर जागा त्यांच्या नावावर करुन द्यावी, किंवा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होत असलेल्या निवडणूकीवर बहिष्कार टाकणार. तसेच सदर निवडणूक रद्द व्हावी. या मागणीसाठी दि. २ नोव्हेंबर २०२३ पासून आमरण उपोषण सुरु करण्यात येणार. असे निवेदनात म्हटले आहे. 


दिलेल्या निवेदनावर नवनाथ पवार, सुरज जाधव, वसंत पवार, साहेबराव पवार, सुनील बर्डे, संदिप पवार, प्रमोद पवार, अनिल जाधव, राहुल मोरे, संजय जाधव, रवींद्र पवार, संतोष जाधव, प्रतिक पवार, आनंदा साटोटे, सुरेश पवार, गोरख जाधव, अजित लालझरे, आकाश पवार, दत्तात्रय हनवत, सतिष हिंगे, दत्तात्रय तांबे आदिंच्या सह्या आहेत.