Type Here to Get Search Results !

पारनेर - मराठा आरक्षणासाठी टाकळी ढोके श्वर ला शंभर टक्के बंद

मराठा आरक्षणासाठी टाकळी ढोके श्वर ला शंभर टक्के बंद

देसवडेतराजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 



मराठा समाजाला आरक्षण मिळावे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणुन टाकळी ढोके श्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, वैद्यकीय क्षेत्र, व शिक्षणं क्षेत्र बंद मधून वगळण्यात आले होते, सर्व व्यावसायिक या बंद मध्ये सामील झाले सकल मराठा समाज, मराठा महासंघ व ग्रामस्थ यांचे वतीने 

पारनेर चे उप निरीक्षक विजय ठाकूर यांना निवेदन दिले



यावेळी प्रास्तविक चांद शेख यांनी केले, सिताराम खिलारी, अशोक कटारिया, विक्रम झावरे, बाबासाहेब खिलारी, बाळासाहेब खिलारी, संकेत झावरे रामभाऊ तराळ, शिवाजी खिलारी , दत्ता निवडुंगे, यांची भाषणे झाली या वेळी बाळशीराम पाय मोडे, विलास धुमाळ गंगाधर बांडे उपस्थित होत टाकळी ढोके श्वर मध्ये आज पासुन राजकिय पुढाऱ्यांना गाव बंदी केली जाईल आरक्षणाचा प्रश्न मिटला नाही तर सोमवारपासून युवक उपोषणाला बसतील असा इशारा युवा नेते विक्रम झावरे यांनी दिला यावेळी अनेक युवकांची उपस्थिती होती

देसवडे येथे राजकिय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली तसेच तरुणांनी अंत्ययात्रेत सरकार विरोधात घोषणा दिल्या सरकारमधील महत्त्वाचे मंत्री अनेक मराठा आमदार खासदार आज घरात घुसून बसले आहेत त्यांनी ठोस भूमिका घ्यावी मराठा बांधव आत्महत्या करत असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर हे आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिला